माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समितीच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नितीन गुरव यांची निवड
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समितीच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नितीन गुरव यांची निवड करण्यात आली आहे.
माहिती अधिकार आणि पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने राष्ट्रीय महासचिव गोविंद भावे व समस्त विभाग आघाड्यांच्या मार्गदर्शिका अमृता भंडारी आणि प्रकाश भारती यांच्या मार्गदर्शनाखाली व
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दीपक कांबळे यांच्या शिफारसीने ही निवड करण्यात आली.
राष्ट्रीय समाजवादी विचारधारेला अभिप्रेत व लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य हि समाजवादी संकल्पना यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ध्येयधोरणे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबवून अधोरेखित करण्याची जबाबदारी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस औदयोगिक सेलचे अध्यक्ष नितीन गुरव यांचेवर सोपविण्यात आली आहे.
यावेळी माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष अभिजित आपटे, राष्ट्रीय महासचिव गोविंद भावे,
समस्त विभाग आघाड्यांच्या मार्गदर्शिका अमृता भंडारी, प्रदेशाध्यक्ष दिपक कांबळे, राज्य संपर्क प्रमुख कमलेश शेवाळे, उपाध्यक्ष तुळशीराम जांभुळकर, पुष्कर सराफ, राज्य सचिव महेश सरणीकर, सरचिटणीस वजीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.