माजी आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे यांचे स्मरणार्थ रुग्णवाहिका कार्यान्वयीत करण्याची काँग्रेसची नगरपरिषदेकडे मागणी
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : नगरपरिषदद्वारा कोरोना संदर्भाने 7 ऑगस्ट 2020 रोजी तत्कालीन मुख्याधिकारी यांनी नवीन अद्यावत टाटा कंपनीची अंदाजे 25 लाख रूपये किंमतीची रुग्णवाहिका खरेदीसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी पुणे यांना दिला आहे. सदर निधी चाकण नगरपरिषदेकडे जमा आहे. 14 व्या वित्त आयोगातील व्याजाचे 1.43 कोटी उपलब्ध असून त्यापैकी निधी खर्च करून रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी जिल्हाधिकारी यांनी देणे अपेक्षित आहे.
याबाबत प्रस्तावास जिल्हा शल्य चिकित्सक, औंध जिल्हा रूग्णालय यांनी शिफारस देखील दिलेली असून याबाबत चाकण नगरपरिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी उचित प्रक्रिया कार्यात्तर मंजुरी सह देऊन रुग्णवाहिका खरेदी करून त्यावर माजी आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे यांचे नाव व फोटो लावून जनतेच्या सेवेत कार्यान्वित करावी, अशी मागणी चाकण शहर काँग्रेस अध्यक्ष आनंद गाडकवाड यांनी केली आहे. धोरणात्मक व जनहितार्थ कामातुन स्व. सुरेशभाऊ गोरे यांना आदरांजली प्रकट करून चाकण गावची एकजूट सर्व पक्षीय करत आहोत असे त्यांनी नमुद केले.
यासह कोरोना संदर्भाने ग्रामीण रुग्णालयात डिजिटल क्ष-किरण असेल आरोग्य तपासणी यंत्र व कोविड केअर सेंटर देखील ग्रामीण रुग्णालयात 14 व्या वित्त आयोगाचे व्याजाचे पैशातून करणेबाबत मुख्याधिकारी यांना लेखी सुचित केले असून आता मुख्याधिकारी याबाबत गांभीर्याने काम करतील, न केल्यास त्यांचा काँग्रेस पक्षातर्फे गांधी गिरीच्या मार्गाने जाहिर सत्कार करण्यात येईल.