Saturday, August 30, 2025
Latest:
कृषीखेडपुणे जिल्हाविशेष

हुतात्मा राजगुरू सोयाबीन भुसार खरेदी विक्री केंद्राचा आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

सोयाबीनला ३४०० ते ३६६० रुपये भाव

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर : कृषि उत्पन्न बाजार समिती खेड मुख्य मार्केट यार्ड राजगुरूनगर येथे हुतात्मा राजगुरू सोयाबीन भुसार खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ आमदार श्री. दिलीपराव मोहीते. पाटील (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ पुणे) यांच्या शुभ हस्ते तसेच जेष्ठ संचालक माजी सभापती चंद्रकांतदादा इंगवले यांचे अध्यक्षतेखाली, सभापती विनायक घुमटकर, उपसभापती धारू कृष्णा गवारी, सर्व संचालक मंडळ, सचिव बाळासाहेब धंद्रे, सर्व शेतकरी बंधू, अडते, व्यापारी, हमाल, मापाडी यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला. त्यास शेतकर्‍यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

मार्केट यार्डात आज सोयाबीनची २६०० क्विंटल आवक होऊन ३४०० ते ३६६० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

बाजार समितीच्या वतीने सर्व शेतकरी बंधूना आवाहन करण्यात येते की, आपण आपला सोयाबीन हा शेतीमाल जास्तीत जास्त बाजार समिती मध्ये विक्रीस घेऊन यावा. सोयाबीन शेतीमालाचे ओपन लिलावाने बाजारभाव ठरवले जातात. ताबडतोब व चोख वजन तसेच सर्वांना रोख पेमेंट दिले जाते. खेड मार्केट यार्डवर आठवड्यातून प्रत्येक मंगळवार व शुक्रवार या दिवशी सोयाबीन शेतीमाल लिलाव केले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!