महाएनजीओ व मंथन फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सेवा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण : आत्मनिर्भर भारत व आत्मनिर्भर ग्रामअभियान प्रेरित महाएनजीओ फेडरेशन व मंथन फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्तविद्यमाने १४ सप्टेंबर २०२० ते ३ ऑक्टोबर २०२० दरम्यान सेवा सप्ताहानिमित्त खराबवाडी, चाकण, मेदनकरवाडी, म्हाळुंगे, भोसरी, पुणे येथे मंथन फाऊंडेशन च्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न झाले.
त्यात आरोग्य शिबिर, किराणा वाटप, कोरोना जनजागृती, मास्क वाटप करण्यात आले. आयुष मंत्रालय निर्देशानुसार आयुष काढा वाटप करण्यात आला. याचा ५०० महिला व पुरुषांनी लाभ घेतला.
यावेळी मंथन फाउंडेशन अध्यक्षा आशा भट्ट यांनी मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे कार्यकर्ते देविदास मोरे, योगेश निकम, अनिता चव्हाण, भारती बोरकर, आयुष कापडी यांचे सहकार्य मिळाले. यावेळी कविता परदेशी, तेजस वाकचौरे, माजी उपसरपंच माधुरी खराबी, आशा वर्कर कविता म्हस्के, सिंधुताई गजशिव, विमल केसवड, सुनंदा शिंदे आदी उपस्थित होते.