सभापती भगवान पोखरकर यांचा मा. खासदार आढळराव यांच्या हस्ते सत्कार
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
घोडेगाव : खेड पंचायत समितीचे नवनिर्वाचित ‘सभापती’
शिवसेनेचे भगवान पोखरकर यांची बहुमताने निवड झाल्याबद्दल शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख, व शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते त्यांच्या शिवनेरी निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी निवडक पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. आढळराव पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.