दुसरीकडे काय पद मिळते, ते बघून निर्णय : एकनाथ खडसे
माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते खडसे हे महिनाभरात पक्ष सोडणार ?
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
जळगाव : माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते खडसे हे महिनाभरा मध्ये पक्ष सोडणार असून दुसऱ्या पक्षात काय पद मिळते याची प्रतीक्षा आहे असा संवाद असणारी एक आॅडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एकनाथ खडसे हे मागच्या काही दिवसापासून पक्षावर नाराज आहे त्यांनी आपली नाराजगी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून जाहीर केली होती. यामुळे ते पक्ष सोडणार अशी चर्चा होती. या दरम्यान एकनाथ खडसे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीतही स्थान न दिल्यामुळे त्यांची नाराजी अधिकच वाढली आहे. या मुळे अनेक कार्यकर्ते जशी संवाद साधून त्यांना योग्य निर्णय घ्या, अशी मागणी करीत आहे.
अशाच प्रकारे भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील रोशन भंगाळे या कार्यकर्त्याने खडसेंशी संपर्क साधून पक्ष सोडण्याविषयी चर्चा केली. ही आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
या क्लिपविषयी खडसे यांनी सांगितले की, कार्यकर्ते अशा प्रकारची विचारणा करीतच असतात. तो कॉल चुकीचा असून ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज नाही.