मोहितेवाडी रोहित्राची दुरावस्था, विजेचा धोका, शेतकऱ्यांची दुरुस्तीची मागणी
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
शेलपिंपळगाव : मोहितेवाडी ( ता. खेड ) येथील ढाशी वस्तीवरील रोहित्राची दुरावस्था झाली असून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील रोहित्राला झाकण तर नाहीच पण फ्यूज बाॅक्सही गंजले असून विजेचा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथे शेतकऱ्यांकडून विजेची मागणी जास्त असल्याने जास्त लोडमुळे रोहित्रात वारंवार बिघाड होत आहे. पाण्याअभावी कांदे रोप मरायला लागले आहे.

येथील शेतकरी व खेड तालुका बाबाशेठ मिसाळ मिञ मंडळाचे अध्यक्ष सुनील पोतले, नवनाथ पोतले, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पोतले, दशरथ मोहिते, विनायक मोहिते, सचिन मोरे, भानुदास पोतले, सोमनाथ पोतले, रामदास पोतले, साहेबराव पोतले, हनुमंत पोतले, गणेश पोतले, दत्तोबा पोतले,
हिरामण पोतले, विक्रम पोतले, किसन मोहिते, रोहित मोहिते,
अनिल मोहिते रोहित्राचा बॉक्स दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.