वडिलांच्या स्मरणार्थ कोविड सेंटरला मिनरल वॉटर भेट व कोरोना योद्ध्यांचा सन्मान
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
म्हाळुंगे इंगळे : अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख विनोद म्हाळुंगकर यांचे वडील स्व. सहदेवभाऊ महाळुंगकर पाटील यांचे स्मरणार्थ अखिल भारतीय वारकरी महामंडळ, खेड तालुका सामाजिक व अध्यात्मिक युवक चळवळ यांच्यावतीने म्हाळुंगे इंगळे येथील कोविड सेंटर मध्ये २५०० बोटल्स पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले.
तसेच मागील सहा महिन्यांपासून अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कामगार या कोरोना योद्ध्यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी ह.भ.प. सतिश महाराज काळजे, वारकरी महामंडळाचे प्रदेश संपर्क प्रमुख विनोद महाळुंगकर पाटील, सुनिल देवकर, समाजभूषण संदिप बोञे, लिलाधर तुपे, संदिप येळवंडे, अतुल जावळे, तानाजीराव महाळुंगकर गुरुजी, शंकर महाळुंगकर, सम्राट तुपे आदी उपस्थित होते. प्रसंगी कोविड सेंटरच्या मुख्य व्यवस्थापकिय अधिकारी डॉ.अपेक्षा बोरकर, समन्वयक विलास भवरे यांच्यासह कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.