Saturday, April 19, 2025
Latest:
खेडपुणे जिल्हाविशेषशैक्षणिक

आळंदीत नविन शैक्षणिक धोराणावर व्याख्यान उत्साहात 

 

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
आळंदी : येथील एम आय  टी कला, वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालय, आळंदी  येथील उन्नत भारत अभियान विभाग व  राष्ट्रीय  सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांसाठी “नवीन शैक्षणिक धोरण-२०२०” या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान आयोजित .करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.बी. वाफारे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली  महाविद्यालयाचे उन्नत भारत अभियान समन्वयक व  राष्ट्रीय  सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीराम कारगांवकर ह्यांनी  कार्यक्रमाचे प्रास्ताविका केले . या विषयावर  प्रा. अर्चना आहेर यांनी व्याख्यान दिले व नवीन शैक्षणिक धोरण-२०२०” बद्दलचे सर्व नियम व नवीन बदल या वर  माहिती दिली व त्यांमागील रुपरेषा स्पष्ट केली .

सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्रकल्प संचालक विजय खोडे, उउपप्राचार्य डॉ. मानसी अतीतकर व उपप्राचार्य प्रा. अक्षदा कुलकर्णी, सर्व विभाग यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. श्रीराम कारगांवकर, प्रा. संदिप ढवळे, प्रा. वसंत करमाड, या.से.यो. स्वयंसेवक कामेश गौतम, शुभम फाळके, तन्मय कुंभार, मोनालिसा बसक ह्यांनी विषेश परिश्रम घेतले.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!