कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ पुणे जिल्हा किसान काँग्रेस व पुणे जिल्हा कांदा उत्पादन शेतकरी यांच्या कडून ‘निषेध’
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने भाजप सरकारच्या पोटात पोटसुळ उठला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच शेतकरी कोरोनाच्या संकटात सापडलेला असल्याने केंद्र सरकारने पुन्हा शेतकऱ्यांना संकटात टाकू नये. तसेच कांद्यावरील निर्यात बंदी लवकरात लवकर मागे घ्यावी, अशी मागणी पुणे जिल्हा किसान काँग्रेस व पुणे जिल्हा कांदा उत्पादन शेतकरी यांनी केली.
कांदा निर्यात बंदी उठलीच पाहिजे. भारत हा निर्यातीच्या बाबतीत एक बेभरवशाचा देश आहे, अशी प्रतिमा आंतरराष्ट्रीय बाजारात बनण्याची शक्यता बळावते. ती आपल्याला परवडणारी नाही. या परिस्थितीचा अनाठायी फायदा पाकिस्तान आणि इतर कांदा निर्यातदार देशांना मिळू शकतो. त्यामुळे याकडे केंद्रातील भाजप सरकारने काळजीपूर्वक लक्ष द्यावे आणि कांदा निर्याती बंदी लवकरात लवकर उठवावी.” कांदा निर्यात बंदी विरोधात केंद्रातील भाजप सरकारचा पुणे जिल्हा किसान काँग्रेस व पुणे जिल्हा कांदा उत्पादन शेतकरी यांच्या कडून ‘जाहीर निषेध ‘ करण्यात येत आहे.
– चंद्रकांत गोरे ( अध्यक्ष – पुणे जिल्हा किसान काँग्रेस )