तीन महिन्याच्या गाथा बाळाने केली कोरोनावर मात
कुटुंब कोरोनाग्रस्त होऊनही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोत्रे जपताहेत सामाजिक बांधिलकी,
पै. गणेश बोत्रे युथ फाऊंडेशनच्या वतीने म्हाळुंगे कोविड सेंटरला १२०० मिनरल वॉटर बॉटल्स भेट
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण एमआयडीसी : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हे आपल्या तीन महिन्याचा गाथा बाळ व कुटुंबासह स्वतः कोरोनाग्रस्त असूनही सामाजिक बांधिलकी जपत आहेत. त्यांचा मार्गदर्शनाखाली पै. गणेश बोत्रे युथ फाऊंडेशनच्या वतीने म्हाळुंगे येथील कोविड सेंटरला १२०० मिनरल वॉटर बॉटल्स भेट दिल्या आहेत.
बोत्रे यांनी लॉक डाऊन काळात अक्षरशः प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून किराणा किट, भोजन वाटप, मास्क, सॅनिटायझर वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली असताना त्यांचा अनेकांशी संपर्क आला आहे. त्यांच्या कुटुंबातील भाऊ, भावजय अगदी तीन महिन्याच्या चिमुकल्यालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्या या छोट्या बाळानेही कोरोनावर मात केली आहे. मात्र त्यांच्यासह कुटुंबावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
“माझ्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी आपल्या टेस्ट करून घ्याव्यात व आपल्यासह आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन गणेश बोत्रे यांनी केले आहे. तसेच १८ व १९ तारखेला घरोघरी येऊन सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे”, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पै. गणेश बोत्रे युथ फाऊंडेशनच्या वतीने कोविड सेंटरला १२०० मिनरल बोटल्स वाटप करताना नितीनभाऊ गाडे, सुधीरभाऊ गाडे, राजुशेठ गाडे, अक्षयभाऊ पवार, नितीन बोत्रे, दशरथभाऊ बोत्रे व कोविड सेंटर मधील डॉक्टर्स उपस्थित होते.