कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. १५ सप्टेंबर २०२० ) – चिंताजनक : खेड कोरोना रुग्णांचा ५ हजाराचा टप्पा पार, सात जणांचा मृत्यू
खेड तालुक्यात आज ११७ नवीन कोरोना रुग्णांची वाढ,
राजगुरूनगर, आळंदी व चाकणला आज सर्वाधिक रुग्ण,
आज नगरपरिषद हद्दीत ४८, तर ग्रामीण भागात ६९ रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या ५०७८,
कोरोनमुक्त होणाऱ्या रुग्णांनी केला चार हजाराचा टप्पा पार, ४०४८ रुग्ण बरे होऊन गेले घरी,
महाबुलेटिन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. १५ सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने ११७ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून तालुक्यात कोरोना रुग्णांनी ५ हजाराचा टप्पा पार केला आहे. आज राजगुरूनगर शहरात सर्वाधिक २२ रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून तालुक्यात राजगुरूनगर शहरातील ३, चाकण शहरातील २, आळंदी शहरातील १ व निघोजे मधील एक असा एकूण ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यात ४०४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ४८, तर ग्रामीण भागात ६९ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ९०९ झाली असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ५०७८ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ४८ ) :- राजगुरूनगर – २२, चाकण – १०, आळंदी – १६,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ६९ ) :-
# ५ पेक्षा जास्त रुग्ण असलेली गावे :- नाणेकरवाडी – १६, मेदनकरवाडी – ८, शेलपिंपळगाव – ७, महाळुंगे इंगळे – ५,
# ४ रुग्ण आढळलेली गावे :- काळुस
# ३ रुग्ण आढळलेली गावे :- o
# २ रुग्ण आढळलेली गावे :- चांडोली, खराबवाडी, सातकरस्थळ, भोसे, चऱ्होली, मरकळ, रासे, निमगाव.
# १ रुग्ण आढळलेली गावे :- देशमुखवाडी, कुरुळी, निघोजे, वासुली, पाडळी, राक्षेवाडी, शिरोली, पिंपरी बुद्रुक, तुकाई भांबुरवाडी, शेलगाव, सोळू, कडधे, कान्हेवाडी ( वाडा )
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ११७
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ५०७८
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १२१
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ९०९
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ४०४८
# सर्वाधिक रुग्ण आढळलेली टॉप ६ गावे :- राजगुरुनगर – २२, आळंदी – १६, नाणेकरवाडी – १६, चाकण – १०, मेदनकरवाडी – ८, शेलपिंपळगाव – ७.
# मयत झालेल्या व्यक्ती : ०७
———————————
# १ पुरुष ( वय – ६१, रा. राजगुरूनगर, जयहिंद हॉस्पिटल, १३ सप्टेंबर )
# १ पुरुष ( वय – ६२, रा. राजगुरूनगर, ससून हॉस्पिटल, १३ सप्टेंबर )
# १ महिला ( वय – ७४, रा. राजगुरूनगर, अलायन्स हॉस्पिटल, १३ सप्टेंबर )
# १ पुरुष ( वय – ४५, रा. आळंदी, ससून हॉस्पिटल, १३ सप्टेंबर )
# १ पुरुष ( वय – ५८, रा. निघोजे, ससून हॉस्पिटल, १३ सप्टेंबर )
# १ पुरुष ( वय – ६३, रा. चाकण, ससून हॉस्पिटल, १३ सप्टेंबर )
# १ पुरुष ( वय – ६२, रा. चाकण, लाईफलाईन हॉस्पिटल, १४ सप्टेंबर )