खेड पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी सतीश गुरव यांची नियुक्ती, पदभार स्वीकारला
महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : खेड पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी सतीश गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथील पीआय अरविंद चौधरी यांची मावळ तालुक्यातील कामशेत पोलीस ठाण्यात बदली झाल्याने ही जागा रिक्त होती. त्यांच्याजागी गुरव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.
गुरव हे १९९३ च्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागात काम केलेले आहे. त्यामुळे गुन्हगारांवर त्यांचा चांगलाच वचक आहे. कोल्हापूर वासीय गुरव हे सेवाभावी वृत्तीचे असले तरी चुकीला क्षमा नाही, त्यामुळे गुन्हेगारांवर त्यांचा दबदबा आहे.
राज्यात गाजलेला तेलगी स्टॅम्प घोटाळा, महाराष्ट्र एटीएस, आर्थिक गुन्हे शाखा आदी ब्रँच मध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. मात्र खेड पंच क्रोशीतील गुन्हेगारी मोडून काढण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.