कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. १२ सप्टेंबर २०२० ) चिंताजनक : खेड तालुक्यात आज १३५ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, राजगुरूनगर, चाकण व आळंदी शहरात आज सर्वाधिक रुग्ण
एकूण रुग्णांची संख्या ४७६८,
३७७० रुग्ण बरे होऊन गेले घरी,
नगरपरिषद हद्दीत ५२, तर ग्रामीण भागात ८३ रुग्णांची वाढ,
महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. १२ सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने १३५ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. राजगुरूनगर, चाकण व आळंदी शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून तालुक्यात ३७७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ५२, तर ग्रामीण भागात ८३ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ८९१ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ४७६८ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ५२ ) : राजगुरूनगर – २१, चाकण – १७, आळंदी – १४,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ८३ ) :
# अधिक रुग्ण आढळलेली गावे :- भोसे – ८, चिंबळी – ६, कुरुळी – ६, मेदनकरवाडी – ६, शेलगाव – ६, कडाचीवाडी – ५, नाणेकरवाडी – ५, म्हाळुंगे इंगळे ५,
# ३ रुग्ण आढळलेली गावे :- आंबेठाण, खराबवाडी, शिंदे, शिरोली, दौंडकरवाडी
# २ रुग्ण आढळलेली गावे :- चांडोली, राक्षेवाडी, सातकरस्थळ,
# १ रुग्ण आढळलेली गावे :- कडुस, खांलुब्रे, मोई, वाकी खुर्द, कुरकुंडी, पिंपरी बुद्रुक, सांडभोरवाडी, बहुळ, केळगाव, मरकळ, रासे, वडगाव घेनंद, चास,
कान्हेवाडी ( वाडा ), रेटवडी.
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – १३५
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ४७६८
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १०७
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ८९१
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ३७७०
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर – २१, चाकण – १७, आळंदी – १४,
# मयत झालेल्या व्यक्ती : ०