नाईक, उगलमोगले यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार
महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर :अ.भा.वंजारी युवा संघटनेच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी लाखेवाडीच्या ऋषिकेश नाईक व उपाध्यक्षपदी महेश उगलमोगले यांची निवड झाल्याबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना पाटील यांनी ज्येष्ठ नेते दिवंगत गोपिनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. आपली व त्यांची मैत्री महाराष्ट्राला माहीत होती. मुंडे यांनी वंजारी समाजासाठी प्रचंड मोठे काम केले आहे. आगामी काळात पंकजा मुंडे यांच्या सहकार्याने इंदापूर तालुक्यातील वंजारी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असे पाटील म्हणाले.
सत्कारास उत्तर देताना अध्यक्ष नाईक व उपाध्यक्ष उगलमोगले यांनी आगामी काळात तालुक्यातील वंजारी समाजाचे प्रश्नांच्या सोडवणूकी साठी पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकीता पाटील, निरा भिमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करु, अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी रामचंद्र नाईक, बाळासाहेब उगलमोगले, दादा पानसरे, भागवत नाईक, अशोक उगलमोगले उपस्थित होते.
——-