बेवारस पुरुषाचा मृतदेह आढळला…
आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी वाचा महाबुलेटीन न्यूज
महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( प्रतिनिधी ) : येथील आळंदी केळगाव रस्त्यालगत असलेल्या सुलभ शौचालयाजवळ एक अज्ञात पुरुष मयत अवस्थेत मिळून आल्याची माहिती आळंदी पोलिस ठाणे अमलदार विजय चासकर यांनी दिली.
या संदर्भात आळंदी पोलिस ठाण्यात दीपक बाळासाहेब धिरडे ( रा. आळंदी, अगस्ती मंगल कार्यालया जवळ, ता. खेड, जि. पुणे ) यांनी खबर दिली आहे.
मयत अनोळखी पुरुषाचे अंदाजे वय ५५ ते ६० वर्षे असून दिनांक ३ सप्टेंबर २०२० रोजी आळंदी केळगाव रोड जवळील सुलभ शौचालया जवळ मयत अवस्थेत मिळून आला.
अज्ञात मयत पुरुषाचे वर्णन :- डोकीस काळे पांढरे केस, रंग सावळा, पांढरी दाढी, ऊंची अंदाजे साडे पाच फुट.
पुढील तपास पोलिस हवालदार विजय चासकर करीत आहेत. या संदर्भात आळंदी पोलिस स्टेशन संपर्क क्रमांक ९९२२८३२२१४ यावर संपर्क करण्याचे आवाहन आळंदी पोलिसांनी केले आहे.