Saturday, April 19, 2025
Latest:
राष्ट्रीयविशेष

भारत चीन सीमेवर चीन कडून पुन्हा तणावाचे वातावरण ; लष्करप्रमुख लडाखच्या दौऱ्यावर

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क :
दिल्ली : चीनला भारता कडून वेळोवेळी सडेतोड उत्तर मिळूनही चीन कडून लेह लढाख सीमेवरील कुरापती काही बंद होण्याचे नाव घेताना दिसत नाही आहे. पुन्हा चीनने लेह सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण केले आहे. भारत आणि चीनदरम्यान सीमेवर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे.

दि. २९-३० ऑगस्टच्या रात्री लडाखमधील पँगाँग त्सो लेकच्या दक्षिण भागात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट झाली होती. चिनी सैन्याकडून जमीन आणि हवाई क्षेत्रातून घुसखोरीचा प्रयत्न झाला. दरम्यान भारतानेही चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं.

या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख मनोज नरवणे हे लडाखच्या दौऱ्यावर आहेत. चीनसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख नरवणे हे आज फील्ड कमांडर यांच्यासह सैन्य तैनाती आणि अन्य तयारीचा आढावा घेणार आहेत.

काल, गुरुवारी ( दि. ३ सप्टेंबर ) लष्करप्रमुखांनी काही फॉरवर्ड लोकेशन्सचा दौरा केला. आपल्या या दोन दिवसांच्या दौऱ्यात लष्करप्रमुख सैनिकांच्या ऑपरेशनल तयारीचा आढावा देखील घेणार आहेत. लष्करप्रमुखांच्या दौऱ्याआधी बुधवारी वायुसेना प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी पूर्व लडाखचा दौरा केला होता. वायुसेना प्रमुखांनी चीनच्या सीमेला लागून असलेल्या सिक्किम, असम, अरुणाचल, मेघालयमध्ये वायुसेनेच्या कॉम्बॅट यूनिट्सच्या आपरेशनल तयारीचा आढावा घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!