Saturday, April 19, 2025
Latest:
खेडगणेशोत्सवविधायकविशेष

राजगुरुनगरमध्ये रक्तदानास उस्फुर्त प्रतिसाद

 

महाबुलेटिन नेटवर्क
राजगुरूनगर : गणेशोत्सवानिमीत्त राजगुरूनगरमध्ये सामाजिक बांधिलकी जपत क्रांतीवीर राजगुरू मित्र मंडळ (बाजारपेठचा राजा) व अविनाश बाळकृष्ण कहाणे युवा प्रतिष्ठाणतर्फे करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डीस्टन्सचे पालन करून रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते. या शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

—– कोरोना या महामारीचा काळात संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या सामाजिक जाणीवेतून राजगुरूनगर येथील क्रांतिवीर राजगुरू मित्र मंडाळाने रक्त संकलनाचा उपक्रम आयोजित करण्याचे ठरवले. यास नागरीकांनी चांगला प्रतिसाद देत ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. मंडळ प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. मंडळाने राबवलेल्या दरवर्षीच्या उपक्रमात सामाजिक संदेश, समाजोपयोगी कामे यावर भर असतो. मंडळाचे काम कौतुकास्पद राहिले आहे.

दरम्यान रक्तदान शिबिरावेळी वे खेडचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल लाड, तसेच पोलीस दलातील राजेश नलावडे , छावा संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ ढोले, नगराध्यक्ष‌ शिवाजी मांदळे, सुनिल वाळुंज, बाळासाहेब कहाणे, धनंजय कहाणे, अरविंद गायकवाड, मच्छिंद्र पवळे, राहुल पिंगळे व मंडळाचे सर्व कार्यकर्ते हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!