Wednesday, April 16, 2025
Latest:
जुन्नरपुणे जिल्हाविशेष

ओतूर येथे चार दुकाने आगीत भस्मसात

 

अंदाजे २० लाखाहून अधिक नुकसान

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
ओतूर : नगर-कल्याण महामार्गावर ओतूर ( ता.जुन्नर ) येथील मांडवी नदीवरील पुलाच्या पुढे असणाऱ्या कल्याण-जुन्नर मार्गावरील माळशेज हाँटेलच्या कॉर्नरजवळील पत्र्याचे शेड असलेल्या चार दुकांनांना शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून सर्व दुकाने भस्मसात झाली आहेत. या आगीत चार दुकानदारांचे अंदाजे २० लाखापेक्षा जास्त नुकसान झाले आहे, असा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

या रस्त्यावर गणेश चांगदेव थोरात यांचे जयमल्हार अँटोमोबाईल स्पेअर पार्टचे दुकान आहे. त्यातील इलेट्रीकल औजारे, सर्व मशिनरी, स्पेअर पार्ट जळून खाक झाले. त्यांचे सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर जय मल्हार अँटोमोबाईल स्पेअर पार्ट या दुकानातील सर्व स्पेअर पार्टस जळून १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

तसेच विक्रम रंजन खरात यांचे गणराज अँटोमोबाईल अँन्ड गॅरेज हे दुकान आहे. त्यात गाड्यांची इंजिने टायर, बॅटरी, स्पेअर पार्ट व दुचाकी जळून खाक झाली. त्यांचे सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

माऊली हुंडेकरी अँन्ड ट्रान्सपोर्ट मधील कांदा बियाणे, बारदान, कपाटे, लाकडी फर्निचर व दोन दुचाकी भस्म होऊन सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

आग विझवण्यासाठी जि.प. सदस्य मोहीत ढमाले, पं.स. जुन्नरचे सभापती विशाल तांबे यांनी व त्यांचे मित्रपरिवार, ग्रामस्थ यांनी अटोकाट प्रयत्न केले, पण आगीने रुद्ररूप धारण केल्याने व सर्वत्र आगीचे डोम, धूर, आवाज यामुळे सर्वांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

आग लागल्याचे वृत्त ओतूर पोलीसांना कळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी घटना स्थळाची प्रत्यक्ष पहाणी केली.

आज सकाळी घटनास्थळी जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, ओतूरचे मंडलाधिकारी लवांडे, तलाठी पंधारे यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून महसूल विभागाच्या वतीने रीतसर पंचनामा केला आहे.

या चारही दुकानदारांचा चरितार्थ दुकानावरच अवलंबून आहे, त्यांना दुसरा कोणताही आधार नाही. त्यामुळे त्यांना तातडीने शासकीय मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी तहसिलदारांकडे केली आहे.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!