आळंदी नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण २०२० स्पर्धेत पहिल्या दहात संकल्प पूर्ण, जिल्ह्यात दहावा क्रमांक
आळंदी नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण २०२० स्पर्धेत पहिल्या दहात संकल्प पूर्ण, जिल्ह्यात दहावा क्रमांक,
स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये राज्यात ३९ वा क्रमांक
महाबुलेटीन न्यूज / अर्जुन मेदनकर
आळंदी : आळंदी नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या स्पर्धेत सहभागी होत असून यावेळी अधिकाधिक लोकसहभाग वाढवून शासनाच्या सुचानादेशांचे पालन करीत देशातील नगरपरिषदांमध्ये पहिल्या दहा नगरपरिषदामध्ये तीर्थक्षेत्र आळंदीचा क्रमांक मिळविण्याचा संकल्प पूर्ण केला असल्याची माहिती नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर व मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.
आळंदी नगरपरिषदेचा स्वच्छ सर्वेक्षण २०१९ ला १४१ वा क्रमांक होता. मात्र अधिकचे परिश्रम घेत मुख्याधिकारी समीर भुमकर यांचे मार्गदर्शनात व नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे नियंत्रणात स्वच्छ सर्वेक्षण २०२० ला आळंदी नगरपरिषदेने पश्चिम विभागात ४६ वा क्रमांक, तर राज्यात ३९ वा क्रमांक पटकावून उत्कृष्ठ काम केले. स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये एकूण ६००० गुणासाठी परिक्षा झाली. यात आळंदी नगरपरीषदेने ३५९७.७६ इतके गुण मिळवून पश्चिम विभागात ४६ वा क्रमांक, तर राज्यात ३९ वा क्रमांक मिळविला असल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.
स्वच्छ सर्वेक्षण परिक्षेत शहरात घरोघरी विलगीकृत पध्द्तीने कचरा संकलन करणे, संकलन केलेल्या कच-यावर प्रक्रिया करणे, शहरात मोफत शौचालय सुविधा पुरविणे, शहरातील सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थित सक्षम करणे. शहरे शाश्वत बनविण्याच्या दुष्टीने उपाययोजना करणे. शहरातील सार्वजनिक ठिकाणचे सर्वेक्षण करणे बाबीवर भर देण्यात आला होता. शहरातील नागरिकांना प्राप्त होत असणा-या आरोग्य विषयक सूविधाबाबत नागरिकांकडुन प्राप्त अभिप्रायांना देखील स्वच्छ सर्वेक्षणमध्ये गुण देण्यात आले . तसेच यावर्षी नगरपरिषदेने टाकाऊ वस्तु पासुन सुशोभित सुशोभित वस्तु बनविण्याचा नाविन्यपुर्ण उपक्रम राबविला होता.
आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्षा मिरतई पाचुंदे, मुख्याधिकारी समीर भुमकर , आरोग्य समिती सभापती सागर भोसले, विविधा विषय समिती सभापती, नगरसेवक व नगरसेविका तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचेसह सामाजिक संस्था, शाळा, नागरिक आणि पत्रकार यांनी केलेल्या प्रयत्ना मुळे मागील २०१९ वर्षाच्या १४१ व्या क्रमांकावरुन विभागात ४६ वा व राज्यात ३८ वा क्रमांक मिळणे शक्य झाल्याचे आरोग्य विभाग समिति सभापती सागर भोसले यांनी सागितले.
आळंदी शहरात कार्तिकी यात्रा कालावधी मध्ये Garbage Free City परिक्षा होवु शकली नाही अन्यथा GFC चे ६०० मार्क्स मिळवुन अधिक चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण होत अपेक्षित मानांकन मिळाले असते. मात्र आळंदी यात्रा कालावधीमध्ये शहरात लाखोंच्या संख्येने येणा-या भाविकांमुळे शहरात अतिरिक्त कच-याचा प्रश्न निर्माण होत असल्याने या कालावधीत आळंदी नगरपरिषदेला Garbage Free City परिक्षेला सामोरे जाणे शक्य झाले नाही. मात्र या येणा-या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये अधिक उत्साहाने व जोमाने कामगिरी करुन नगरपरिषदेला देशात पहिल्या १० वा क्रमांक मिळविण्याचा मानस असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.
आळंदी स्वच्छ सुंदर व हरित चा संकलप असून नागरिकांनी आवाहन करण्यात आले आहे . शहरात ओला व सुका कचरा वेगवेगळा करून दिल्यास कच-याचे १००% विघटण शक्य होणार आहे. यातून स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये आळंदीत चांगली कामगिरी करता येईल असे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले .
—————