रस्त्यावरील खड्डे बुजवताहेत पोलीस, नॅशनल हायवेचे दुर्लक्ष
रस्त्यावरील खड्डे बुजवताहेत पोलीस, नॅशनल हायवेचे दुर्लक्ष
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : चाकण-तळेगाव रस्त्यावर म्हाळुंगे व चाकण च्या तळेगाव चौकात व माणिक चौकात चक्क वाहतूक पोलिसांनीखड्डे बुजविले आहेत. पाऊस सुरू झाल्यापासून या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा ठरत होता. तसेच अपघाताचा धोका निर्माण झाला होता. याबाबत महाबुलेटीनने वेळोवेळी आवाज उठविला होता. म्हाळुंगे येथे श्रीपती बाबा महाराज पादुका समोरील खड्ड्यांमुळे चाकण-तळेगाव रस्त्यावर खूप ट्राफिक होत होती, त्यामुळे महाबुलेटीन च्या वृत्ताची दखल घेऊन येथील खड्डे म्हाळुंगे पोलिसांनी स्वतः बुजवून घेतले. तसेच माणिक चौकातील खड्डे सुद्धा चाकण पोलिसांनी भरून घेतले. पीएसआय डावरे मॅडम
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई अरुण साबळे व इतर कर्मचारी यांनी स्वतःहून खड्डे बुजवून घेण्यासाठी प्रयत्न केले.