Thursday, April 17, 2025
Latest:
खेडगणेशोत्सवपुणे जिल्हाविधायकविशेषसण-उत्सवसामाजिक

महाबुलेटीनच्या वतीने इकोफ्रेंडली गौरी व गणपती आरास / सजावट स्पर्धेचे आयोजन

 

महाबुलेटीनच्या वतीने इकोफ्रेंडली गौरी व गणपती आरास / सजावट स्पर्धेचे आयोजन


महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
चाकण : खेड तालुक्यात कोरोनाचे संकट अद्यापही मोठे आहे. कोरोना संसर्गाची साखळी रोखण्यासाठी या काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी तसेच घरोघरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांनी केले असून, या आवाहनाला प्रतिसाद देऊन ‘महाबुलेटीन न्यूज’ने इको फ्रेंडली घरचा गणपती आणि गौरी आरास / सजावट स्पर्धांचे आयोजन केले आहे. यासाठी चाकण येथील श्री एस. पी. देशमुख शिक्षण संस्थेचे विद्यानिकेत इंग्लिश मिडीयम स्कुल व विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कुल आणि समृद्धी सीएनजी पंप यांचे प्रयोजकत्व लाभले आहे.

या स्पर्धेत पर्यावरणपूरक वस्तू वापरून केलेल्या सजावटीला प्राधान्य राहील. या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या इच्छुकांनी 9822364218 या क्रमांकावर आपले नाव व पत्ता मेसेज / व्हाट्सएपच्या माध्यमातून नावनोंदणी करावी, त्यानंतर त्यांना इतर नियमावली कळविली जाईल. सदरहू स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पार पडणार आहे.

गौरी व गणपती स्पर्धेसाठी बक्षिसे :
प्रथम क्रमांक : 3000 रुपये व सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक : 2000 रुपये व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक : 1000 रुपये व सन्मानचिन्ह
( टीप : गौरी व गणपती या दोन्ही स्पर्धांसाठी स्वतंत्र बक्षिसे देण्यात येतील )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!