Saturday, August 30, 2025
Latest:
खेड विभागपिंपरी चिचंवडपुणे शहर विभागमहाराष्ट्रराजकीयविशेष

राजकीय किस्से : ओबामा काही आलेच नाही..!

राजकीय किस्से : ओबामा काही आलेच नाही..!

महाबुलेटिन नेटवर्क। शिवाजी आतकरी
राजकीय क्षेत्र म्हणजे रोजचा आखाडा. या आखाड्यात डाव-प्रतिडाव आलेच. आरोप- प्रत्यारोप तर ठरलेलेच. त्यात निवडणूक आली तर या साऱ्याला उधाण आले म्हणून समजा. अशीच ती लोकसभेची निवडणूक होती. पूर्वाश्रमीचा खेड व सध्याचा शिरूर मतदारसंघ. येथे एकांड्या शिलेदाराप्रमाणे लढून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडले होते. राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला ढासळला. हे शल्य राष्ट्रवादी काँग्रेसला बोचत राहिले. या मतदारसंघात सर्व आमदार राष्ट्रवादीचे; मात्र खासदार शिवसेनेचे, असे विचित्र चित्र राहिले होते.
अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने अनेक प्रयोग केले. वेगवेगळी नावे चर्चेत आणली. दिलीप वळसे पाटील, अजित दादा पवार, रोहित पवार इतकेच काय दस्तुरखुद्द शरद पवार यांचेही नाव चर्चेत आणले. आढळराव पाटलांपुढे आव्हान मोठे होते. भिडल्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यातूनच मगआढळराव पाटील आव्हान देत राहिले. माझ्या विरोधात कोणीही उभे राहिले तरी मीच निवडून येणार, असे ते आव्हान देत राहिले. हिंमत असेल तर वळसे पाटील, अजित पवार यांनी विरोधात लढावे, असे आव्हान दिले. दस्तुरखुद्द शरद पवार जरी उभे राहिले तरी हटणार नाही. पवारांविरुद्धही मी विजयी होईल, असे आढळराव यांचे आव्हान होते. इतकेच काय ओबामा आले व निवडणूक लढले तरी मीच जिंकणार, असे आढळराव पाटील आव्हान देत राहिले. हा राजकीय रणनीतीचा भाग होता. माईंडगेम होता.
आव्हान पेलणार नाही ते शरद पवार कसले? साहेबांनी निश्चय केला होता. त्यांनी ओबामा नाही आणले, पण ‘ट्रम्प’ कार्ड मात्र काढले. डॉ अमोल कोल्हे छाव्याने राष्ट्रवादीचा गड पुन्हा सर केला. एकूणच काय की ओबामा काही या निवडणुकीला आलेच नाही, शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर मात्र ओबामा आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचा किस्सा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!