Wednesday, April 16, 2025
Latest:
खेडदिन विशेष

आळंदीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
आळंदी : येथील अण्णाभाऊ साठे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य  व  झोपडपट्टी सुरक्षा दल महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने  अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त नवीन एसटी स्टँड वाय जंक्शन चौकात आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
या निमित्त लोकमान्य टिळक व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन आळंदी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वैंजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव , दिघी पोलीस स्टेशनचे पीएसआय तरंगे, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक सचिन गिलबिले, गटनेते व नगरसेवक पांडुरंग वहिले, नगरसेविका रुक्मिणी  कांबळे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, सुरेश आप्पा तापकीर, आळंदी शहराचे शिवसेना विभाग प्रमुख व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ  साठे  फाऊंडेशनचे  खजिनदार सुरेश झोंबाडे, फाऊंडेशनचे मार्गदर्शक नानासाहेब साठे, चाकण नगरीचे युवा उद्योजक साहेब झोंबाडे, पत्रकार  अर्जुन मेदनकर आदी मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन महाराष्ट्र राज्यचे सचिव सूर्यकांत खुडे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक कधी उभे होणार याविषयी प्रास्ताविकात मत व्यक्त केले. तसेच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची भारत सरकारकडे मागणी केली. आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी त्यांच्या मनोगतात  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे राहिलेले अर्धवट काम पूर्णत्वास नेणार असल्याचे समाजास आश्वासन दिले.
आळंदी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर  यांनी अभिवादन व्यक्त करताना साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी म्हणजेच पुढील वर्षी होणारी जयंती स्मारकात होईल अशी ग्वाही फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व समाजास दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व फाउंडेशनचे मार्गदर्शक नानासाहेब साठे यांनी आळंदीतील अण्णाभाऊ साठे स्मारकाची जागा फाउंडेशनच्या ताब्यात देण्याची मागणी आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना केली.
यावेळी माऊली कंपनी व फाउंडेशनच्या वतीने २०० माक्स चे वाटप मोफत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
अध्यक्ष संतोष सोनवणे, उपाध्यक्ष सनी गवई, प्रमोद पारडे, राहुल बाजड, आदेश सोनवणे, सिद्धेश्वर कांबळे, रमाकांत शिंदे, राम टिंगरे, विनोद पवार, वैष्णवी सोनवणे यांनी परीश्रम घेतले. जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच पदाधिकाऱ्यांत  प्रतिमा पूजन, मास्क वाटप, अभिवादनाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमात सॅनिटायझर व सर्व शासकीय नियमांचे पालन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!