आळंदीत एक गाव एक गणेश उत्सव राबविण्याची मागणी

महाबुलेटिन नेटवर्क
आळंदी : तीर्थक्षेत्र अलंकापुरीसह राज्य आणि देशातही कोरोंनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने सुरक्षिततेसाठी या वर्षातील गणेशोत्सव साधेपणाने तसेच एक गाव एक गणेशोत्सव उपक्रम राबविण्याची मागणी भैरवनाथ उत्सव मंडळाचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे पाटील यांनी केली आहे.
एक गाव एक गणपती या मागणीचे निवेदन आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव,आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी यांना देऊन यासाठी गणेश मंडळांची स्वतंत्र बैठक लावण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. एकाच ठिकाणी उत्सव साजरा करण्यासाठी श्री भैरवनाथ उत्सव मंडळ आळंदी ग्रामस्थ जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे त्यांनी निवेदनात त्यांनी म्हटले आहे. आळंदी मधील सर्व गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींची यासाठी एक बैठक घेऊन सध्य स्थितीचा विचार करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे हजेरी मारुती मंदिर आळंदी या एकाच ठिकाणी श्रीची वैभवी गणेश मुर्ती बसवून अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा अशी विनंती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.