Sunday, August 31, 2025
Latest:
खेडप्रशासकीयविशेष

खेडमधील ‘हे’ अधिकारी बदलणार?

महाबुलेटिन नेटवर्क
राजगुरूनगर: कोविड चे संकट नसते तर कदाचित लवकरच बदल्यांचे प्रकार संपले असते. शासनाच्या धोरणानुसार पंधरा टक्के बदल्या दहा ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहेत. त्यातील खेड तालुक्यातील महत्वाच्या पदावरील काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
        कोरोना संकट काही अधिकाऱ्यांच्यादृष्टीने इष्टापत्ती ठरले आहे तर काहींच्या दृष्टीने डोकेदुखी. कोरोनामुळे आंतरविभागीय बदल्या होणार नसल्यामुळे पुणे विभागात येणासाठी इच्छुक असणाऱ्या अधिकाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. मुख्य प्रवाहाबाहेर असणाऱ्या मात्र प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या अनेकांना पंधरा टक्के या निकषामळे बदलीसाठी वाट पहावी लागणार आहे. काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असून त्यासाठी मोर्चेबांधणी त्यांची सुरू आहे.
      खेड तालुक्यापुरते सांगायचे झाल्यास तीन नगरपरिषदांचे मुख्याधिकारी बदलले. चाकण या महत्त्वाच्या पोलीस ठाण्यात नवीन पोलीस निरीक्षक रुजू झाले. राजगुरूनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षकही बदलले जाणार असल्याचे समजते. सध्या प्रभारी चार्ज असणारे पोलीस निरीक्षक कायम राहणार अशीही चर्चा आहे. तहसीलदार यांच्याबद्दल दस्तुरखुद्द आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी तक्रारी केल्या आहे. वरिष्ठ पातळीवर आमदारांनी केलेल्या तक्रारींमुळे खेड तहसीलदार बदलीची चर्चा जोरदार आहे. अशीच चर्चा खेड प्रांत बदलीची आहे. हे महत्वाचे अधिकारी बदलले जाणार याची चर्चा खेड तालुक्यात असून कदाचित येणाऱ्या आठवड्यात या बदल्यांचे मुहूर्त साधले जाऊ शकतात. त्यामुळे ‘हे’ अधिकारी जातील आणि नवीन अधिकारी येणार याची चर्चा आहे. नवीन अधिकारी कोण याचीही कुजबुज काही वर्तुळात होताना दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!