म्हाळुंगे कोविड सेंटरला प्रवीण दरेकर यांनी दिली भेट
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
म्हाळुंगे इंगळे : महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज ( दि. २७ जुलै ) चाकण एमआयडीसीतील महाळुंगे येथील कोव्हिड केअर सेंटरला भेट दिली.
यावेळी त्यांनी गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, इतर डॉक्टर्स व कर्मचारी यांचेकडून इथल्या सोयी व अडचणी यांची माहिती घेतली. तसेच रुग्णांशी देखील त्यांनी संवाद साधला.
आपत्ती व्यवस्थापन निधीमधून याठिकाणी अजून काही सुविधांची गरज आहे, कोव्हिड केअर सेंटरला मोफत विज मिळावी, टेस्टची संख्या वाढवावी. व्हेंटिलेटर सुविधा असणाऱ्या हॉस्पिटलची संख्या वाढवावी आदी विषय जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी त्यांच्या लक्षात आणून दिले.
यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, उपाध्यक्ष सुनील देवकर, माजी अध्यक्ष दिलीप वाळके, प्रीतम शिंदे, अजय जगनाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.