वाढदिवस खर्च टाळत मंदिर परिसरात केले वृक्षारोपण
महाबुलेटीन नेटवर्क / विनोद गोलांडे
बारामती : मोढवे ( ता. बारामती ) येथे मरीमाता मंदीर परिसरात जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपन करण्यात आले.
आता सध्या सर्व जगावरती कोरोनाच्या संकटामुळे वाढदिवस मोठ्या पद्धतीने साजरा न करता मंदिराच्या परिसरात ४४ व्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून ४४ झाडे लावण्यात आली.
यावेळी जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने, वनाधिकरी माणिक भोसले, टिक टॉक स्टार सुरज चव्हाण, उपाध्यक्ष महेश जाधव, आर.पी.आयचे बारामती तालुका अध्यक्ष विश्वास भोसले, अमित चव्हाण, आकाश वाघमारे, रविंद्र जाधव, विकास खोमणे, गणेश जगदाळे, पप्पु गोलांडे, विनोद जाधव इ.च्या उपस्थित करण्यात आले.