श्रीअनंतपाळ नुतन महाविद्यालयाच्या निकालाच्या यशाची परंपरा कायम



महाबुलेटीन नेटवर्क / ओमप्रकाश तांबोळकर
लातुर : जिल्ह्यातील शिरूरअनंतपाळ शहरातील नामांकित असलेल्या श्रीअनंतपाळ नुतन महाविद्यालयाच्या कला, विज्ञान या दोन्ही शाखेचा निकालाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी निकालाच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल 94.77 टक्के लागलेला आहे. यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल 100 % टक्के लागलेला आहे. कला शाखेचा निकाल 88 % टक्के लागलेला आहे. विज्ञान शाखेत एकूण 75 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. सर्व विद्यार्थी पास झाले आहेत तर कला शाखेत एकुण 60 विद्यार्थी परिक्षेला बसले होते, त्यापैकी 53 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेतुन कु. लखन रेड्डी याने 77 % टक्के मार्क घेवुन सर्वप्रथम आला, तर कु. प्रशांत ओमप्रकाश तांबोळकर हा 71.53 % टक्के घेऊन द्वितीय आला. कला शाखेतुन शिवहार शिंदे हा 80 % टक्के मार्क्स मिळवून प्रथम, तर कु. आरती वाघमारे हिने 76 % टक्के मार्क घेवुन द्वितीय आली आहे . विद्यालयातुन 36 प्रथम श्रेणीत, तर 87 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत.
श्रीअनंतपाळ नुतन विद्यालय हे ग्रामिण भागातील नावाजलेले असुन येथे गोरगरिबाचे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यामुळे महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थाकडून कठीण मेहनत करून घेतात. त्यामुळेच महाविद्यालयाने ही निकालाची यशाची परंपरा कायम राखली. यामध्ये प्राचार्य शिवाजीराव मादलापुरे, नाब्दे, संजय चिद्रेवार व सर्व प्राध्यापक वर्गांनी अतिशय मेहनत घेऊन ही निकालाची परंपरा कायम राखली आहे. या यशामध्ये शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेही योगदान आहे. या निकालाच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव जगताप, कार्यध्यक्ष भारत कोंडेकर, चिटणीस प्रभाकरराव कुलकर्णी, उपाध्यक्ष सुर्यकांतराव येरोळकर, शालेय व्यवस्थापण समितीचे उपाअध्यक्ष पत्रकार ओमप्रकाश तांबोळकर, प्राद्यापक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.