Saturday, April 19, 2025
Latest:
आरोग्यकोरोनामहाराष्ट्रविशेषसामाजिक

या थुंकणाऱ्यांना आळा घाला हो…! संसर्गाचा धोका वाढतोय

महाबुलेटिन नेटवर्क | शिवाजी आतकरी
थुंकणाऱ्यांचा देश अशी वाईट उपाधी मिरवणारे आपण भारतीय.  थुंकण्याने होणारा जंतुसंसर्ग आणि त्यातून पसरणारी गंभीर रोगराई हे लक्षात केव्हा येणार? कुचकामी कायदा आणि त्याहूनही कुचकामी अमलबजावणी यातून थुंकणाऱ्यांचे फावतेय. कुठेही पचापचा थुंकणाऱ्यांनी सामाजिक आरोग्याचा प्रश्न निर्माण केला आहे. थुंकणाऱ्यांमध्ये असणाऱ्या  स्वयंशिस्तीचा अभाव आणि बेपर्वाई यांना आळा घालण्यासाठी कायदा करून भागणार नाही तर सामाजिक जागृती आणि दबाव गट निर्माण होण्याची गरज आहे. अन्यथा थुंकणाऱ्यांमुळे सामाजिक स्वास्थ्यापुढे जटील प्रश्न  निर्माण होत आहे. कोरोना विषाणूने जग थांबवले. अशा अनेक रोगराई थोपवण्यासाठी नियमांची नव्हे तर स्वयंशिस्तीची गरज आहे.
थुंकण्यामुळे पसरणारे संभाव्य आजार
क्षयरोग(टीबी),न्यूमोनिया, स्वाइन फ्लू,श्वसनाचे आजार,पचनसंस्थेचे आजार, कर्करोग, पुनरुत्पादन क्षमता कमी होणे, इत्यादी
पोलीस कायदा 
मुंबई पोलीस अधिनियम १९५१, कलम११६ अन्वये सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे, थुंकणे, तंबाखूजन्य उत्पादनांचे उत्पादन, जाहिरात, साठवण, पुरवठा, विक्री करण्यास बंदी.
कायदा 
मुंबई प्रांतीय (प्रादेशिक)  अधिनियम 1949 च्या अनुसूचीतील प्रकरण 14 मध्ये नमूद नियम 5 (1) व (2) मधील तरतुदीनुसार तसेच कलम 69 नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा घाण करण्यास मनाई आहे. दंडनीय कारवाईची तरतूदीसोबतच संबंधीताकडून आकस्मिक खर्च वसूल करता येतो.
हे गंभीर आहे….
सरकारी आकडय़ांनुसार भारतात दरवर्षी क्षयरोगाच्या १९ लाख नवीन केसेस नोंदवल्या जातात. संपूर्ण जगात भारतामध्ये क्षयरोगाची सर्वात जास्त रुग्णसंख्या आढळते.
बसमधून प्रवास करताना, दुचाकीवरून जाताना मागेपुढे न पाहता किंवा सिग्नलवर गाडीचे दार उघडून पिचका-या मारणारे महाभागही आपण बरेच पाहिले असतील. हा फक्त किळसवाण्या प्रकारापुरता विषय नसून, क्षयरोग होण्याचे (टीबी) हेच एक मुख्य कारण असल्याचे नुकतेच एका संशोधनामार्फत समोर आलं आहे.
ना भयं ना लज्जा…
कुठेही थुंकणाऱ्यांनी शासकीय इमारतीचे जिने, भिंती, बस थांबे, रेल्वे थांबे, एसटी, बस, सोसायट्यांचे कोपरे सर्व पिचकाऱ्या मारून विद्रुप केले आहे. कोपऱ्यांवर देवादिकांच्या प्रतिमा लावूनही उपयोग होत नाही. त्या प्रतिमांवरही थुंकणाऱ्यां महाभागांना ना भयं ना लज्जा….!
थुंकण्याचे परिणाम
जंतुसंसर्ग, रोगांचा फैलाव,सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान
आळा कसा बसणार?
परदेशासारखा कडक कायदा
कायद्याची/कारवाईची प्रभावी अंमलबजावणी हवी
सामाजिक भान व स्वयंशिस्त प्रत्येकात हवी
 जग कोरोना या  एका विषाणूने महामारीच्या विळख्यात आहे. मृत्यूचे तांडव जगभरात सुरू आहे. संसर्ग,व समूह संक्रमणाचा हा विषय आहे. या पाश्र्वभूमीवर स्वयंशिस्तच या सर्वांवर एक उपाय आहे, हे मात्र नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!