चाकण नगरपरिषद प्रभाग क्रमांक १२ मध्ये निर्जंतुकीकरण फवारणी, नगरसेविका मेनकाताई बनकर यांच्या प्रयत्नांना यश
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : येथील प्रभाग क्रमांक १२ मधील नगरसेविका मेनकाताई सागरशेठ बनकर यांनी चाकण नगरपरिषद मध्ये प्रस्ताव देऊन आपल्या प्रभागामध्ये निर्जंतुकीकरण फवारणी करून घेतली. यासाठी सागरशेठ बनकर यांनी नगरपरिषद कार्यालयात या प्रस्तावाचा स्वतः पाठपुरावा करून त्वरित फवारणी केली. त्यामुळे या प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून बनकर यांचे आभार मानले. यापूर्वी त्यांनी प्रभागात पेव्हर ब्लॉकही बसवून घेतले आहेत.