पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर
पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने गती दिली आहे. सदर कामासाठी सुमारे 6 हजार 250 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाययोजना करता येणार आहेत.
महायुती सरकारने हडपसर ते यवत सहापदरी रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली. त्यासाठी आता ३ हजार १४६.८५ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. तसेच, तळेगांव-चाकण-शिक्रापूर महामार्गावर चाकणपर्यंत चारपदरी आणि पुढे सहापदरी रस्त्यासाठी ३ हजार १२३.९२ कोटी रुपयांनी निविदा काढली आहे. राज्य सरकारने नियोजित वेळेत निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात करावी, अशी मागणी आहे.
तळेगाव-चाकण- शिक्रापूर रस्त्याच्या रुंदीकरणामुळे पिंपरी-चिंचवड आणि सभोवतालच्या औद्योगिक व निवासी क्षेत्राची कनेक्टिव्हीटी वाढणार असून, वाहतूक समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजना करता येणार आहेत.