खासदार डॉ. अमोल कोल्हे स्वागताने भारावले, प्रचार दौऱ्यात बनकरफाटा येथे जेसीबीतून फुलांची उधळण, जुन्नर तालुक्याचं ठरलंय तुतारीचं बटन दाबायचं : डॉ. अमोल कोल्हे
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे
जुन्नर : शिरुर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर बनकरफाटा येथे जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली. या अभूतपूर्व स्वागताने डॉ. कोल्हे भारावून गेले.
जुन्नर तालुक्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा गावभेट दौरा सुरू असताना बनकर फाटा याठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या माध्यमातून डॉ. कोल्हे यांच्यावर फुलांची उधळण करत स्वागत केले. यावेळी मोठ्या प्रमाणात गावभेट दौऱ्याला शेतकऱ्यांचा व मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.