*सारथी संस्थेमार्फत किल्ले गड परिसर स्वच्छता उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचा गौरव*
पुणे, दि. १४ : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेमार्फत सरदार हिरोजी इंदलकर सारथी किल्ले संवर्धन उपक्रमांतर्गत गड किल्ले परिसर स्वच्छता उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांच्या हस्ते स्वच्छता कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या प्रशिक्षण संस्थांना प्रमाणपत्र व ‘गड किल्ले आणि मी’ हे पुस्तक भेट देण्यात आले. तसेच संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करून पारितोषिके वितरण करण्यात आली.
यावेळी श्री. काकडे यांनी स्वच्छता मोहिमेचा उद्देश सांगितला. श्री. निंबाळकर यांनी संस्थेच्या योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास सारथी संस्थेचे संचालक मधुकर कोकाटे, उमाकांत दांगट, नवनाथ पासलकर, निबंधक संजीव जाधव आदी उपस्थित होते.