अॅनी टेक्नॉलॉजीज आणि उबेर इंडियाला समुच्चयक अनुज्ञप्ती नाही | प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणेच्या बैठकीत अर्ज नाकारले
महाबुलेटीन न्यूज
पुणे दि. १२ : मोटार व्हेईकल अॅग्रीगेटर गाईडलाईन्स २०२० मधील तरतूदीची पूर्ण पूर्तता करीत नाहीत असे पुनर्विलोकनात आढळून आल्याने मे. अॅनी टेक्नॉलॉजीज प्रा.लि. आणि मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा.लि. या दोन्ही अर्जदारांनी चारचाकी हलक्या वाहनांकरिता समुच्चयक अनुज्ञप्ती मिळण्याकरिता सादर केलेले अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी नाकारण्याचा निर्णय घेतला आहे.
रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्रालय दिल्ली यांचे मोटार व्हेईकल अॅग्रीगेटर गाईडलाईन्स २०२० अन्वये मे. अॅनी टेक्नॉलॉजीज प्रा. लि. आणि मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा. लि. यांचे चारचाकी हलक्या वाहनांकरिता अॅग्रीगेटर लायसन्स मिळण्यासाठीचे अर्ज त्रुटींची पूर्तता करण्याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे प्रलंबित होते. दोन्ही अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरणासमोर ११ मार्च २०२४ रोजीच्या बैठकीत पुनर्विलोकनानंतर उचित निर्णयासाठी सादर करण्यात आले होते. मोटार व्हेईकल अॅग्रीगेटर गाईडलाईन्स, २०२० मधील तरतूदीची पूर्ण पूर्तता करीत नाहीत, असे पुनर्विलोकनात आढळून आल्याने दोन्ही अर्ज नाकारण्यात आले.