मंगलदास बांदल यांना जामीन मंजूर
महाबुलेटीन न्यूज
पुणे : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गेली २१ महिने न्यायालयीन कोठडीत असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना उच्च न्यायालयाने चारही गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे बांदल यांचा लवकरच कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बांदल यांच्याबरोबरच अटकेत असलेले बँकेचे अधिकारी व सहआरोपी यांना देखील यात जामीन मंजूर झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
शिक्रापूरचे सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मांढरे यांच्या तक्रारीवरून बांदल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आणखी चार गुन्हे दाखल झाले. पुढील ४ ते ५ दिवसानंतर बांदल यांची जामिनाची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती त्यांची न्यायालयात बाजू मांडणारे वकील प्रतिनिधी अॅड. अदित्य सासवडे यांनी दिली आहे.