खेडचे माजी आमदार स्वर्गीय नारायणराव पवार यांच्या सुकन्या प्रिया पवार यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
खेडचे माजी आमदार स्वर्गीय नारायणराव पवार यांच्या सुकन्या प्रिया पवार यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खेडचे माजी आमदार स्वर्गीय नारायणराव पवार यांच्या सुकन्या प्रिया नारायणराव पवार यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. प्रिया पवार यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची सचिव म्हणून अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली असून नुकताच त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला असून पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे.
गेल्या अनेक वर्ष आपण युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढीसाठी कार्यरत आहात. आपल्या सामाजिक व संघटनात्मक अनुभवाचा उपयोग पक्ष कार्यासाठी निश्चितपणे होईल. आपण ही जबाबदारी सर्वांना सोबत घेऊन यशस्वीरित्या पार पाडाल, असा विश्वास राहुल लोणीकर यांनी व्यक्त करून पवार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. पक्ष संघटनेच्या वाढीसाठी कार्य करून विशेषतः युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे प्रिया पवार यांनी सांगितले.
# नवे पर्व – नवी जबाबदारी… काही दिवसांपूर्वी खेड तालुक्यात झालेल्या जाहीर कार्यक्रमात मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राजकीय जीवनातील नवी वाट निवडली. भारतीय जनता पक्ष – युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची नवी जबाबदारी स्वीकारली. ही संधी दिल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री नारायण राणेसाहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, प्रदेश महामंत्री विक्रांतदादा पाटील आणि युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल दादा लोणीकर यांचे मनःपूर्वक आभार! पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी पूर्णक्षमतेने या जबाबदारीला न्याय देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील. – प्रिया नारायणराव पवार ( प्रदेश उपाध्यक्ष – भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश )
0000