Thursday, April 17, 2025
Latest:
खेडगुन्हेगारीपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाविशेष

खराबवाडीत भैरवनाथ ओढ्याजवळ अनोळखी महिलेचा डोक्यात दगड घालून खून

खराबवाडीत भैरवनाथ ओढ्याजवळ अनोळखी महिलेचा डोक्यात दगड घालून खून

महाबुलेटीन न्यूज

महाळुंगे इंगळे : खराबवाडी ( ता. खेड ) येथे भैरवनाथ ओढ्याजवळील विनायक रेवजी खराबी यांच्या शेतालगत अनोळखी महिलेचाडोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी ( दि. १९ ) घडली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाआहे. घटनास्थळावर एक छोटा चाकू रक्ताने माखलेला दगड आढळला आहे. महिलेच्या गळ्यावर चाकूने वार केल्याच्या खुणा असूनडोक्यात दगड घातल्याने चेहरा रक्ताने माखलेला आहे.

महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे युनिट तीनच्या पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. गुन्हे शाखेच्या डीसीपी सपना गोरे एसीपी प्रशांत अमृतकर, गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनीघटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे :- अंदाजे वय २७ ते ३०, अंगावर निळ्या रंगाचे टॉप्स डार्कनिळ्या/काळ्या रंगाचे लेगीज, फिक्कट निळ्या आकाशी रंगाचे वुलनचे स्वेटर, गळ्यात मंगळसूत्र, पायात पैंजण, आपल्या परिसरातूनकोणी बेपत्ता असल्यास महाळुंगे पोलीस ठाण्याशी मो. ७०२८५३५३२३, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड ( मो. नं. ९९६७६०४००७ ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!