Wednesday, October 15, 2025
Latest:
खेडजयंतीपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रराष्ट्रीयविशेषसत्कार / सन्मान / पुरस्कार

क्रांतिकारकांचे कार्य देशासाठी प्रेरणास्त्रोत : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हुतात्मा राजगुरूंच्या जयंतीनिमित्त हुतात्म्यांच्या वंशजांचा विशेष गौरव

क्रांतिकारकांचे कार्य देशासाठी प्रेरणास्त्रोत : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

हुतात्मा राजगुरूंच्या जयंतीनिमित्त हुतात्म्यांच्या वंशजांचा विशेष गौरव

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर

पुणे, दि. २४ : देशासाठी शहीद झालेल्या क्रांतिकारकांचा देशाला अभिमान आहे. क्रांतिकारकांचे कार्य देशासाठी प्रेरणास्त्रोत आहे, असेप्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राजगुरुनगर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हुतात्मा शिवराम हरि राजगुरू जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, “भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना विसरून चालणार नाही. त्यांच्या बलिदानामुळे आजआपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. हुतात्म्यांच्या देशभक्तीचा जागर झाला पाहिजे. त्यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतदेशसेवेसाठी  नागरिकाने पुढे यावे,” असे आवाहन त्यांनी केले.

देश विकासाच्या मार्गावर पुढे जात असताना या प्रक्रीयेला गती देताना देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिविरांचे स्मरण करणे हे आपलेकर्तव्य आहे. देशाला पुढे जाण्यासाठी आपल्या सर्वाचे प्रयत्न महत्वपूर्ण ठरतील. माझे नाही तर देशाचे आहे, असा राष्ट्रभाव जागृतठेवण्यासाठी आपण शपथ घेतली पाहिजे. त्यामुळे नवीन पिढीत राष्ट्रप्रेम वाढीस लागेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, “देशासाठी क्रांतिकारकांच्या बलिदानाची आपल्याला जाणीव ठेवावी लागेल. ‘राष्ट्र प्रथमहा संस्काररुजवावा लागणार आहे. शाळकरी मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत क्रांतिकारकांचा इतिहास सांगावा लागेल.”

आमदार दिलीप मोहिते यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना हुतात्मा स्मारकाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे तेम्हणाले. ते पुढे म्हणाले, “राजगुरूंच्या वाड्यासाठी निधी दिला असून वाड्याकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने अजितदादा पवार यांनी कोटींचा निधी देऊन थेट राजगुरू वाड्याकडे रस्ता तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. हुतात्मा स्मारकासाठी जे जे लागेलत्यासाठी आम्ही प्रयत्न करू, राज्यपाल यांनी राजगुरूंच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.”

यावेळी हुतात्मा राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू, हुतात्मा सुखदेव यांचे वंशज अनुज थापर, हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचेवंशज रवींद्र पिंगळे, हुतात्मा भगतसिंग यांचे वंशज किरणजीत सिंग, हुतात्मा बाबू गेनू यांचे वंशज किसन सैद यांचा राज्यपाल भगतसिंहकोश्यारी यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, पुस्तक हुतात्मा राजगुरू यांची प्रतिमा देऊन विशेष गौरव करण्यात आला.

पुणे जिल्हा परिषद खेड पंचायत समितीच्या संकल्पनेतून  तयार केलेलीनमन हुतात्मा राजगुरूही गायक मनीष राजगिरे कार्तिकीगायकवाड यांनी गायलेली गीताची चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. प्रास्ताविक सत्यशील राजगुरू यांनी केले. कार्यक्रमाला विविध राज्यातील प्रतिनिधी, स्थानिक नागरिक, स्मारक समितीचे सदस्य, हुतात्मा प्रेमी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाला सहकार्य लाभलेल्या विविध मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पूजाताई थिगळे यांनी सूत्रसंचालन केले, तरमधुकर गिलबिले गुरुजी यांनी आभार मानले. ‘जन गण मनया राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तरवंदे मातरमगीताने सांगताझाली. भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती, खेड तालुका एक क्षण हुतात्म्यांसाठी उपक्रम समिती, सर्व हुतात्मा प्रेमी संस्था संघटनांचे आयोजकांनी आभार मानले.

कार्यक्रमापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हुतात्मा स्मृतीस्थळ, हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ तसेच आपटे वाडा येथे भेट दिली क्रांतिकारकांना अभिवादन केले.

0000

— हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ, खेड तालुका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!