Saturday, April 19, 2025
Latest:
खेडपुणे जिल्हाप्रादेशिकराजकीयराष्ट्रीयविशेष

आळंदीत राज्यपाल यांच्या वक्तव्याचा शिवसेनेतर्फे निषेध

आळंदीत राज्यपाल यांच्या वक्तव्याचा शिवसेनेतर्फे निषेध 

महाबुलेटीन न्यूज

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील शिवसेना युवासेना महाविकास आघाडी यांच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा त्यांनीकेलेल्या वक्तव्याचे निषेधार्थ त्यांचा जाहिर निषेध करण्यात आला.  महाराष्ट्र मराठी माणूस यांचे बद्दल अनुचित वक्तव्य केल्या बाबतनिषेध करून फलक झळकविण्यात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा जाहीर तीव्र शब्दात निषेध करीतजय भवानी, जयशिवाजी, राज्यपाल गो बॅकअसे म्हणतराज्यपाल यांचा जाहीर निषेध असोआदी घोषणा यावेळी शिवसैनिकानी दिल्या.

यावेळी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख उत्तम गोगावले, शहर प्रमुख अविनाश तापकीर, माजी नगराध्यक्ष रोहीदास तापकीर, राष्ट्रवादीकाँग्रेसचे माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, काँग्रेसचे पर्यावरण विभागाचे प्रमूह उमेश रानवडे, शिवसेना शहर संघटक आनंदराव मुंगसे, आशिष गोगावले, शशीराजे जाधव, राहुल सोमवंशी, संदीप पगडे, चारुदत्त रंधवे, बालाजी शिंदे, मंगेश तिताडे, राकेश जाधव, अनिकेतडफळ आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते.

राज्यपालांच्या वक्तव्यामुळे मराठी माणसांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्राचा अपमान झालाआहे. या प्रकरणी राज्यपाल यांनी तत्काळ माफी मागावी. लोक भावनांचा विचार करून महामहिम राष्ट्रापती यांनी महाराष्ट्राच्याराज्यपालांना तात्काळ माघारी घ्यावे, अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!