रक्तदान शिबिरात खेड तालुक्याने पुणे जिल्ह्यात पटकावला प्रथम क्रमांक, तब्बल ४२६ जणांनी केले रक्तदान… ● जिल्ह्यातून १४४० जणांनी केले रक्तदान… ● खेड तालुका प्रथम, इंदापुरचा द्वितीय; तर आंबेगावचा तृतीय क्रमांक…
रक्तदान शिबिरात खेड तालुक्याने पुणे जिल्ह्यात पटकावला प्रथम क्रमांक, तब्बल ४२६ जणांनी केले रक्तदान…
● जिल्ह्यातून १४४० जणांनी केले रक्तदान…
● खेड तालुका प्रथम, इंदापुरचा द्वितीय; तर आंबेगावचा तृतीय क्रमांक…
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर ( पुणे ) : खेड उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरूनगर (ता. खेड) येथील महात्मा गांधी विद्यालयात विशेष रक्तदान शिबीरात ४२४ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. जिल्ह्यातून एकूण १४४० युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे.
पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (भाप्रसे) यांनी जिल्हयामध्ये निर्माण झालेल्या रक्त, पुरवठा तुटवडयाच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व तालुक्यामध्ये दिनांक २२ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीर आयोजीत करणेबाबत आवाहन करण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यात विशेष रक्तदान मोहिम राबविण्यात आली. त्यानिमीत्ताने पुणे जिल्ह्यामधील १३ तालूक्यांमध्ये सरकारी व खाजगी रक्तपेढ्यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीरे घेण्यात आली आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातुन सर्वाधिक ४२४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
पुणे जिल्हयामध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया इत्यादी साथरोगजन्य आजाराचे रुग्ण जिल्हयाच्या विविध भागामध्ये आढळून येत आहेत. या आजारामध्ये शरीरामधील पांढ-या पेशींची संख्या कमी होत आहे आणि यातच कोविड साथिमुळे शाळा, कॉलेज, खाजगी कार्यालये, सामाजिक संस्था यांचेमार्फत घेण्यात येणारी रक्तदान शिबीरे बंद झाल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. डेंग्यू, चिकुनगुनिया व कोविड साथीमुळे रक्तदान शिबीर आयोजनामध्ये निर्माण झालेली अडचण दूर करुन आणि रक्ताचा तुटवडा भरून काढणेसाठी जिल्हयामध्ये रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने खेड उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरूनगर (ता. खेड) येथील महात्मा गांधी विद्यालयात रक्तदान शिबीरामध्ये मोठया संख्येने नागरिक सामील होवून रक्तदान करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण व खेड तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उदघाटन केले. याप्रसंगी तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड, महसूल नायब तहसीलदार संजय शिंदे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौधळ, राजगुरुनगर नगरपरिषद मुख्याधिकारी निवेदिता घारगे, चाकण मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, आळंदी मुख्याधिकारी अंकुश जाधव, चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भगवान काकणे, आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणपत जाधव, चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा ढवळे, गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे, सहायक निबंधक हरिश्चंद्र कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता मधुकर भिंगारदिवे, खेड पोलीस निरीक्षक सतिश गुरव, चाकण ब्लड बँक संचालक चंद्रकांत हिवरकर, रक्तपेढी तंत्रज्ञ नितीन दौंडकर, रविराज भोकनळ, तलाठी संघटनेचे अध्यक्ष बलभीम पाटील, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष शंकर ढोरे, महारेलचे मंदार विचारे, सर्व मंडल अधिकारी, तलाठी वृंद यांच्यासह शासनाचे विविध खातेप्रमुख उपस्थित होते. तलाठी बबन लंघे व मनिषा राऊत यांच्यासह पुरवठा शाखेच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिराची व्यवस्था चोख पाहिली.
००००