मुलाच्या मृत्यूनंतर पुत्र विरहाने वडिलांचा मृत्यू..
मुलाच्या मृत्यूनंतर पुत्र विरहाने वडिलांचा मृत्यू
उमाजी तात्याबा कड यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता.खेड ) येथील जुन्या पिढीतील कार्यकर्ते उमाजी तात्याबा कड ( वय ७० ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, सून, नातवंडे असा परिवार आहे. माजी उपसरपंच नूतन प्रीतम कड यांचे ते सासरे होत. त्यांचा एकुलता एक मुलगा प्रीतम यांचा २५ मे २०२१ रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता, तेंव्हापासून मुलाच्या मृत्यू विरहाने ते खचून आजारी पडले होते, अखेर त्यांनी आजाराशी झुंज देत मुलाच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी आज दि. २८ ऑगस्ट रोजी पुत्रशोकाने आपले प्राण सोडले. त्यामुळे खराबवाडी गावावर शोककळा पसरली असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
००००