Saturday, August 30, 2025
Latest:
कोरोनाखेडपुणे जिल्हामहाराष्ट्रराजकीयविशेष

१७ मंत्र्यांपैकी एकाही मंत्र्याने सरकारी दवाखान्यात उपचार घेण्याची हिंमत का दाखवली नाही? : गणेश भेगडे

१७ मंत्र्यांपैकी एकाही मंत्र्याने सरकारी दवाखान्यात उपचार घेण्याची हिंमत का दाखवली नाही? : गणेश भेगडे

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सरकारी रुग्णालयात दाखल झाले. यावरुन सत्ताधारी पक्ष आपली आरोग्य यंत्रणा अप्रतिम असल्याचा निर्वाळा देत पाठ थोपटून घेत आहे. मग कोरोनाची लागण झालेल्या १७ मंत्र्यांपैकी एकाही मंत्र्याने ही हिंमत का दाखवली नाही? असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की, त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर ते सरकारी रुग्णालयात दाखल होतील. त्यांची कोरोना चाचणी दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले. आता यावरुन भाजपाने सत्ताधारी पक्षांना प्रश्न विचारला आहे.

आत्तापर्यंत अशोक चव्हाण, बच्चू कडू, धनंजय मुंडे, वर्षा गायकवाड, हसन मुश्रीफ, नितीन राऊत यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधल्या १७ मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले, सत्ताधारी १७ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली एकाही मंत्र्यांने नीतिमत्ता दाखवली नाही. शासनाचा पैशाचा पुरेपूर वापर कसा करून घ्यायचा हे मात्र महाराष्ट्राच्या जनतेला कळले, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस हे खरच आदर्श व्यक्तीमत्त्व आहे व राहील. त्यांचे मन किती मोठे आहे यावरून हे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आले आहे, असे पुणे ग्रामीणचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!