1 जूननंतर राज्यातील काही भागात लॉकडाऊनचे नियम शिथिल होणार; दुकानांसाठीच्या वेळाही बदलणार
1 जूननंतर राज्यातील काही भागात लॉकडाऊनचे नियम शिथिल होणार; दुकानांसाठीच्या वेळाही बदलणार
महाबुलेटीन न्यूज : किशोर कराळे
मुंबई : देशात कोरोना संसर्ग फोफावत असताना मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात काहीसं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. अशातच सध्या लागू करण्यात असणाऱ्या लॉकडाऊनला येत्या काळात कोणतं वळण मिळणार याचसंदर्भातील प्रश्न जनतेच्या मनात घर करत आहेत.
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे, तूर्तास राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मात्र लॉकडाऊन शिथिल केला जाणार आहे अशी माहिती विश्वासार्ह सूत्रांनी दिली आहे.
● कसं असेल 1 जूननंतरचं चित्र?
——————————————
– 1 जूननंतर राज्यातील काही भागात लॉकडाऊनचे नियम शिथिल होणार
– ज्या जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे त्या जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ चे काही नियम शिथिल केले जातील
– ज्या जिल्ह्यात संसर्ग कमी झाला नाही त्या जिल्ह्यात ब्रेक द चेनचे नियम कायम राहतील आणि त्याचा अधिकार त्या जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल.
– ‘ब्रेक द चेन’ चे नियम शिथिल करताना वेगवेगळ्या टप्प्यात निर्णय घेतला जाणार
– सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत दुकानं उघडी ठेवण्याचा निर्णय 1 जून नंतर होऊ शकतो
– ज्या जिल्ह्यांमध्ये कोरणा चा संसर्ग कमी झाला आहे अशा जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकान उघडी ठेवण्यास सुद्धा परवानगी देण्याची तयारी
– मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सध्यातरी बंदच राहणार
– धार्मिक स्थळे ही सध्या तरी बंद ठेवण्यात येणार आहेत
– जिल्हाबंदी सध्या तरी कायम राहण्याची शक्यता आहे. ००००