महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News
New Delhi : नवी दिल्ली : महाराष्ट्रात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील लढत थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. शरद पवार यांचे छायाचित्र वापरल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला फटकारले. निवडणूक प्रचारासाठी शरद पवारांच्या चित्राचा वापर का करता?, असा सवाल सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला केला.
सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला सुनावले, आता तुम्ही वेगळा राजकीय पक्ष आहात. त्यांच्यासोबत न राहण्याचा निर्णय घेतला आहात. मग त्यांचे चित्र का वापरणार?. आता तुम्ही तुमची स्वतःची ओळख घेऊन जनतेसमोर जा. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला शरद पवार गटाच्या याचिकेवर शनिवारपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आणि पुढील सुनावणी १९ मार्च ही तारीख दिली. राजकीय फायद्यासाठी अजित पवार यांनी नावाचा आणि छायाचित्रांचा गैरवापर केल्याचा आरोप शरद पवार गटाने आपल्या याचिकेत केला असून त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटास उत्तर देण्यास सांगितले आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.