कृषी

प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेच्या लाभासाठी फसव्या संदेशापासून सावध राहण्याचे आवाहन

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर
पुणे, दि. १४ :
महाऊर्जामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेच्या लाभासाठी बनावट संकेतस्थळावरून व संदेशाद्वारे महाकृषी ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी संदेशद्वारे (एसएमएस) लिंक पाठविली जात असून नागरिकांनी या खोट्या, फसव्या संकेतथळांना भेट देऊ नये तसेच कोणत्याही प्रकारचा पैसे भरणा करू नये, असे आवाहन महाऊर्जा कार्यालयाने केले आहे.

प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ३. ५ व ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषिपंप देण्यात येत असून याकरिता केंद्र व राज्य शासनामार्फत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास ९० टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास ९५ टक्के अनुदान दिले जाते. सौर कृषिपंपासाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास १० टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा संदेश पाठविला जातो.

योजनेच्या अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेढा) च्या अधिकृत संकेतस्थळाला (www.mahaurja.com) भेट द्यावी किंवा ०२०-३५०००४५० या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे विभागीय महाव्यवस्थापक ए.व्ही.कुलकर्णी यांनी कळविले आहे.

MahaBulletinTeam

Share
Published by
MahaBulletinTeam

Recent Posts

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

3 hours ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

1 day ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

2 days ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

1 week ago

MahaBulletin — 12 Oct 2026

रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेड…

1 week ago

MahaBulletin — 09 Oct 2026

बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…

2 weeks ago

This website uses cookies.