गुन्हेगारी

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज
महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) :
एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १ गावठी पिस्तुल व ०२ जिवंत काडतुसे हस्तगत करून अटक करण्यात आली असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, दि.१७/०६/२०२५ रोजी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे शाखा युनिट ३ कडील पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे, पोलीस हवालदार यदु आढारी, सोनवणे, मेरगळ, जैनक, बाळसराफ असे अभिलेखावरील पाहीजे आरोपींचा शोध घेत असताना वरील पथकास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार, म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे गु.र.नं. ६५६/२०२४ भा. दं. वि. कलम ३२४ या गुन्हयामधील गेले एक वर्षापासुन पाहीजे असलेला आरोपी नामे शुभम सोमेश्वर मुंगडे ( वय २० वर्षे, रा. कडाचीवाडी, ता. खेड, जि. पुणे, मुळ रा. तडखेल, ता. देगलुर, जि. नांदेड ) यास निघोजे येथून ताब्यात घेतले. त्याचे अंगझडती मध्ये १ गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे मिळून आली.

सदर आरोपी विरुध्द पोलीस शिपाई रामदास यशवंत मेरगळ यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे गु.र.नं. ३८४/२०२५ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे, पोलीस हवालदार आढारी, सोनवणे, मोरे, मेरगळ, जैनक, बाळसराफ, काळे, नागेश माळी यांनी केली आहे.

MahaBulletinTeam

Recent Posts

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

2 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

5 days ago

MahaBulletin — 29 Aug 2026

शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 28 Aug 2026

बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…

1 week ago

MahaBulletin — 23 Aug 2026

शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 weeks ago

This website uses cookies.