महाबुलेटीन न्यूज : पिंपरी–चिंचवडमधील चिखली गावात अज्ञाताने एकावर गोळीबार केल्याची घटना घडली असून यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोन्या तापकीर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सोमवार (दि. 22) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडल्याचे चिखली पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे पिंपरी–चिंचवड शहरात एकच खळबळ माजली आहे.
पिंपरी–चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिखली परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सोन्या तापकीर याच्यावर भरदिवसा गोळ्या झाडल्या. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सोन्या तापकीर यांचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे पिंपरी–चिंचवड शहरात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
0000
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 📰 चाकणमध्ये…
बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ चाकण…
शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
This website uses cookies.