महाबुलेटिन नेटवर्क / संतोष म्हस्के
भोर : पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या इमारतींना अनेक वर्षे झाल्याने जिल्यातील बहुतांशी शाळांच्या इमारती जुन्या होऊन त्यांची दुरावस्था झालेली आहे. जिल्ह्यातील या दुरावस्था झालेल्या शाळांना दुरुस्तीसाठी लागेल एवढा निधी देऊ, असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबाडे ( ता. भोर ) येथे शाळेच्या दुरुस्तीच्या भूमीपुजन प्रसंगी केले.
विसगाव खोऱ्यातील धावडी येथे स्मशानभूमी, नळपाणी पुरवठा योजना व आंबाडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीचे भूमिपूजन शिवतरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ठराविक कार्यकर्त्यांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, उपाध्यक्ष अशोकआप्पा शिवतरे, युवा कार्यकर्ते संदीप नांगरे, युवकाध्यक्ष मनोज खोपडे, सरपंच शरद खोपडे, उपसरपंच रुपाली मनोज खोपडे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष उल्हाळकर, राजेंद्र खोपडे, सचिन पाटणे, कॉन्ट्रॅक्टर संभाजी खोपडे,अभिषेक खोपडे,गोरख खोपडे,बाजीराव खोपडे, ज्ञानेश्वर खोपडे, अविनाश सटाले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.