पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांची मोफत कोरोना टेस्ट, स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय

महाबुलेटीन नेटवर्क
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवंसेदिवस झपाट्याने वाढत असल्याने शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नागरिकांची मोफत कोरोना टेस्ट करण्यात यावी, असा निर्णय महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
स्थायी समितीचे सभापती संतोष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील दोन आठवड्यापासून शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शहरातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी आणखी खबरदारी घेण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या सदस्यांनी आयत्यावेळी हा ठराव केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी खासगी व सरकारी अशा दोन्ही लॅबच्या साहाय्याने कोरोना स्वॅब तपासणी करावी.  करण्यात यावी. त्यासाठी येणारा प्रत्यक्ष खर्च मंजूर करावा, असे या ठरावात म्हटले आहे. स्थायी समितीचे सदस्य मयूर कलाटे यांनी मांडलेल्या या ठरावाला पंकज भालेकर यांनी अनुमोदन दिले आहे.
admin

Recent Posts

MahaBulletin — 09 Oct 2026

बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…

2 days ago

MahaBulletin — 06 Oct 2026

सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 05 Oct 2026

रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खरपुडी…

6 days ago

MahaBulletin — 04 Oct 2026

शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 आळंदी…

1 week ago

MahaBulletin — 02 Oct 2026

गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 दिव्यागर…

1 week ago

MahaBulletin — 01 Oct 2026

बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

1 week ago

This website uses cookies.